शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा – राहुल गांधी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | आज सरकारची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या धोरणाच्या मध्यवर्ती केंद्रस्थानी ठेवावा लागेल. त्याची रक्षा करणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले भारत जोडो यात्रेअंतर्गतगुरुवारी (ता.१७) वाडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते.गांधी म्हणाले, ‘‘शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा. त्याला वेळेवर कर्जपुरवठा केला पाहिजे. सरकारने त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. यूपीए सरकारच्या काळात हे सर्व केले जात होते. मात्र आता शेतकरी, युवक हा सरकारपासून दूर आहे . त्यामुळेच भारत जोड़ो यात्रेला युवकांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.देशात भीती, एकमेकांमध्ये द्वेष, हिंसा पसरविण्याचे काम भाजप करीत आहे. विरोधकांना दाबण्याचे काम सुरू आहे. युवकांना रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही. जो अन्न देतो, त्याला कोणाची साथ नाही. तो विमा काढतो तर त्याला लाभ मिळत नाही. मालाला भाव मिळत नाही. महाराष्ट्रात सरकारी शिक्षण संस्था, दवाखाने बंद केले जात आहेत,’’ असे मत त्यांनी मांडले.

 

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment