शेतकऱ्यांनी अप्रमाणित किटकनाशक खरेदी करु नये

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I किटकनाशकाची गुणवत्ता तपासणीसाठी मे.एच.पी.एम केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड, दिल्ली या किटकनाशक कंपनी उत्पादित किटकनाशक कार्बेन्डॅझिम 12 % + मन्कॉझेब 63 % डब्लु.पी. ट्रेड नाव – स्टफ, बॅच नंबर S- 333, पॅकींग 250 ग्रॅम या किटकनाशकाचा नमुना शासकीय किटकनाशक तपासणी प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आला होता.

 

सदर किटकनाशकाचा नमुना किटकनाशक तपासणी प्रयोगशाळेत तपासणीतअंती अप्रमाणित आढळून आला आहे. त्यामुळे या किटकनाशकाच्या शिल्लक साठयास विक्री बंदची कारवाई करण्यात आलेली आहे. तरी सुध्दा या बॅचचे या किटकनाशकाची शेतकरी बांधवांनी खरेदी करु नये, असे आवाहन कृषि अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment