पत्ता कोबीच्या शेतात शेतकरीने फिरवले नागर !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ फेब्रुवारी २०२३।  निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतात एखादं चांगलं पीक आलं की, त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्याचबरोबर पण चांगलं पीक आल्यानंतर त्याला मार्केटमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.

एका शेतकऱ्याने तर चक्क अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविला आहे. उत्पादन खर्च ही निघत नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं शेतकऱ्याने सांगितलं आहे.

मागच्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्यात पत्ता कोबीचे दर बाजारात घसरले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याचे कारण देत नैराश्यातून अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ताकुक्यातील पालान्दूर येथे घड़ली आहे. पालांदूर येथील बागायतदार टीकाराम भुसारी यांनी दीड एकरात भाजीपाल्याची बाग सजवली आहे. त्यात भेंडी, फुलकोबी, पत्ताकोबी, कारले, वांगे अशा भाज्यांची लागवड केली आहे. यात अर्धा एकरात पत्ता कोबी लावली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून माल काढणीला आला आहे. मात्र, भावात तेजी दिसत नसल्याने नाईलाजाने उभ्या पिकात नांगर चालवावा लागला आहे.

बातमी शेअर करा
#cabbagefield
Comments (0)
Add Comment