शेतकऱ्यांना जमीन NA करावी लागणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २५ डिसेंबर २०२२ Iजमिनीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे एग्रीकल्चरलं म्हणजे कृषिक आणि दुसरी म्हणजे नॉन अग्रिकल्चरल अर्थातचं अकृषिक. कृषिक जमिनीचा वापर हा शेतीसाठी होतो आणि अकृषीक जमीनीचा रहिवासी प्रयोजनासाठी तसेच विकास कामांसाठी किंवा शेती सोडून इतर कामासाठी होतो हे आपणास ठाऊकच आहे.

आता जमिनी संदर्भात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गावठाणपासून 200 मीटर अंतराच्या आत असलेली जमीन एन ए म्हणजेच नॉन अग्रिकल्चरल करण्याचे आवाहन केले आहे.

म्हणजेच आता पुणे जिल्ह्यातील गावठाण पासून 200 मीटर अंतराच्या आत असलेली जमीन विकास नियंत्रण नियमांच्या अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी नॉन अग्रिकल्चरल वापरासाठी रुपांतरीत केली असल्याचे मानण्यात येणार आहे. आणि ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment