शेतकऱ्यासाठी गुड न्यूज : एकाच अर्जावर घ्या लाभ !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १६ जानेवारी २०२३ ।  जगभर भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून आहे. सरकारही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तयार करत असते. बऱ्याचदा शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता सरकारच्या सर्व योजना डिजिटल असूनही शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचत नाही. आता शेतकऱ्यांसाठी सरकाने एक गुड न्यूज दिली आहे. डीबीटी पोर्टलवरून सरकारी योजनांना अर्ज करताना आता एकाच अर्जावर एकूण १४ योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही आता डीबीटी वरून एकवेळा एखाद्या योजनेला अर्ज केला कि नंतर तोच अर्ज एडिट करून तुम्ही पुन्हा दुसऱ्या योजनेलाही अर्ज करू शकणार आहेत. तसेच एखाद्या योजनेला अर्ज करतानाच तुम्हाला योजनांची निवड करण्याचा पर्याय दाखवण्यात येतो. तुम्ही यातील कितीही पर्यायांची निवड करू शकता. यानंतर लॉटरी पद्धतीने तुमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सदर योजनेचा लाभ मिळतो. सरकार सातत्याने शेतकरी उपयोगी योजना बनवत आहे. शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच.

बातमी शेअर करा
#getbenefitsonone application
Comments (0)
Add Comment