कमी पैश्यात नफा देणारी बांबू शेती ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १४ जानेवारी २०२३ । सध्याच्या युगात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळेल असे होवू शकत नाही, आज अनेक तरुण कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यानंतर आपली शेती करून मोठे उत्पन्न घेवू लागले आहे. त्यांच्याकडून अनेक पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते. बांबू शेती कशी करायची? याविषयी आपण जाणून घेऊया.

तसे पाहिले तर बांबू हा असा घटक आहे कि त्याचा वापर अनेक उद्योगधंद्यांत केला जातो. फर्निचर निर्मितीपासून ते अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात करतो. बांबू व्यवसायासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सुरुवातीला त्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे. यासह, आपण कोणत्याही ऑनलाइन साइटवर आपले खाते बनवू शकता आणि बांबू उत्पादने चांगल्या किंमतीत विकू शकता.

जसे प्रत्येक हंगामात विशिष्ट पीक घेतले जाते तसे बांबू या पिकाची शेती करण्यासाठी काहीच हंगामाची गरज भासत नाही. अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही. एकदा बांबू लागवड केली, की 4 वर्षांनंतर बांबू कापणी केली जाते. बांबूच्या दोन झाडांमधील अंतर 5 फूट ठेवावे लागते. यानुसार 3 वर्षांत सुमारे 240 रुपये प्रति झाड खर्च येतो.

एखाद्या पिकाची लागवड केली कि त्याचे आयुर्मान हे ठरलेले असते. ठराविक कालावधी पर्यंतच त्या पिकातून आपल्याला अनुदान घेता येते. तुम्ही 3 मीटर बाय 2.5 मीटर अंतरावर बांबूची झाडे लावली, तर एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 1500 रोपांची लागवड होईल. तसेच दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत तुम्ही अन्य पिकेही घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सुरू होऊ शकेल. दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते. ज्या शेतकर्याना बांबूची शेती करायची आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन सुरू केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान दिले जाते. देशात सातत्याने बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.

बांबूच्या लागवड व शेतीसाठी ‘या’ योजनेतून मिळतेय सहाय्य केंद्र सरकारने एप्रिल 2018 पासून राष्ट्रीय बांबू मिशनचे पुनर्गठण केले आहे. भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये सुधारणा करून बांबूला झाड या प्रकारातून वगळण्यात आले. त्यामुळे आता शेतकर्‍यांना बांबूची लागवड, कापणी व वाहतूक करणे सुकर झाले आहे. केंद्र सरकारने बांबूच्या लागवडीला, बांबूवर आधारीत विविध उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. राज्यात बांधावर बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता अटल बांबू समृद्धी योजना, वनशेती उप अभियान, भरीव वृक्षारोपण अशा योजना राबविण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा
#bamboofarming
Comments (0)
Add Comment