मक्याला मिळाला नंदुरबार बाजारसमितीमध्ये चांगला भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या मक्याला चांगला दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.

यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि पांढऱ्या मक्याला चांगला दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे. मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अशातच काही शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत. त्यांच्या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं थोडाफार तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.

 

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment