लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये भाव मिळत होता त्यात तब्बल 1300 ते 1500 रुपये पर्यंत घसरण होऊन कांद्याला सरासरी 1000 ते 1200 इतकाच भाव मिळत आहे.

 

कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन लासलगाव बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदयाला किमान प्रति किलो 30 रुपये भाव देण्याची मागणी केली अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

 

महाराष्ट्र सोबत इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकाला असून आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात घसरण झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment