मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आता विहिरीसाठी अर्ज करू शकतात. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ही अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.१. धारकाकडे किमान 0.40 (एक एकर) हेक्टर क्षेत्र सलग असावे.
२. महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर ३. घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
४. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
५. दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
६. लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
७. लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
८. ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

 

 

 

बातमी शेअर करा
#vihiryojna
Comments (0)
Add Comment