तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपये भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. आता कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तूर काढणी सुरु झालीय.

मात्र आवक वाढण्यासाठी अजून वेळ आहे. सध्या बाजारातील सरासरी आवक कमीच आहे. त्यामुळं तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळतोय.

तुरीचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment