आंतरराष्ट्रीय बाजारातून उडदाची आयात घटणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात उडदाचे दर तेजीत आहेत. त्यामळं यंदा उडदाची आयात साडेतीन लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या हंगामात देशात ६ लाख ६१ हजार टन उडदाची आयात झाली होती. यंदा केंद्रानं उडदासाठी ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात उडदाला ६ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment