शेतकऱ्यांना होणार AI च्या मदतीने फायदा !

बातमी शेअर करा

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

देशभरातील शेतकरी आधुनिक शेतीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न घेत आहे तर सध्या मार्केटमध्ये AI आल्याने अनेक क्षेत्रात वेगवान प्रगती होत असतांना शेतीमध्ये AI च्या मदतीने बऱ्याच गोष्टी करता येत आहेत. हवामानाचा अंदाज वर्तवण्यापासून झाडांना पाण्याची आवश्यकता किती आहे इथपर्यंत सर्व AI च्या मदतीने शक्य होत आहे.

डेटा विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना कोणत्या वेळी कोणत्या संसाधनाचा वापर करावा तसेच कोणत्या प्रकारचे बियाणे वापरावे, पाण्याचा वापर किती करावा? हवामानाचा अंदाज, कीटकनाशकांचा वापर कसा करावा या संबंधित सर्व माहिती मिळणे यामुळे शक्य झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग किंवा कीटकांची भीती असते, रोग लागल्यामुळे उत्पादनात घट होते पिकांना लागलेल्या किडीविषयी माहिती नसेल आणि वेळीच उपचार झाले नाहीत तर नुकसान सहन करावे लागते यासाठी AI चा वापर केल्यामुळे पिकांमध्ये वाढ होईल आणि सुरक्षितता ही वाढते. या संदर्भातील वृत्त WIONने दिले आहे.

बातमी शेअर करा
#ai.
Comments (0)
Add Comment