तेलंगणाच्या शेतकऱ्यांचे कापूस हमीभावासाठी राज्यभर निदर्शने

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |मागील काही वर्षांपासून कापूस पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरत आहे. पिकाचा उत्पादन खर्च वाढला. त्यातच पाऊस आणि कीड-रोगामुळे होणारे नुकसान वाढले. त्यामुळे उत्पादनघटले. या परिस्थितीत सध्याच्या हमीभावातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे कापसाला किमान १२ हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करावा,अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी तेलंगणा रयतु संघम संघटनेच्या नेतृत्वात २९, ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment