ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रतीक्षेत असताना गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत;अशी खरमरीत टीका आ. आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्याना त्यांनी दिलासा देऊन याबाबत ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच
सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील संपत रामनाथ शिंदे व दत्तात्रय धोंडू शिंदे ह्या शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन धीर दिला. बळीराजा व्यथीत आहे,अडचणीत आहे,पण महाराष्ट्राचा अन्नदाता हरलेला नाही,शिवसेना त्याच्यासोबत आहे!“गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, पण मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही.त्यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

 

बातमी शेअर करा
#adityathakre #nashik
Comments (0)
Add Comment