राज्यात या भागात होणार पाऊस ; या शेतकऱ्यानी रहावे सावधान !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २८ जानेवारी २०२३ ।  राज्यात मकर संक्राती होवूनहि हिवाळ्याच्या थंडीचे वातावरण कमी होत नाही. यावर आता येत्या काही दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरता हरभरा, करडई, हळद, तूर, भुईमूग, ऊस, तीळ या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर दिनांक 03 ते 09 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

राज्यात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील काही भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज सांगण्यात आला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरता हरभरा, करडई, हळद, तूर, भुईमूग, ऊस, तीळ या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे.

बातमी शेअर करा
#rainCitibank
Comments (0)
Add Comment