“हे” धानाचे वाण ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय; वाचा.. वैशिष्ट्ये!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० एप्रिल २०२४ | सध्या महाराष्ट्रात काही भागांमध्ये शेतकरी धान रोपांच्या तयारीसाठी उत्कृष्ट धान बियाण्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ‘रत्नागिरी ८’ (सुवर्णा-मसुरा) हे धानाचे वाण शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. यंदा विद्यापीठाने या वाणाच्या बियाण्याची गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विक्री करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘रत्नागिरी ८’ हे वाण वर्ष २०१९ मध्ये विकसित केले आहे. हे वाण प्रामुख्याने १३५ ते १३८ दिवसांमध्ये परिपक्व होते. या वाणाच्या दाण्यांचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. या धानाच्या पिकाची उंची तीन ते साडेतीन फूट इतकी असते. ‘रत्नागिरी ८’ या वाणाच्या मदतीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल इतके उत्पादन मिळू शकते. विद्यापीठाने एकूण सहा राज्यांसाठी या वाणाची शिफारस केलेली आहे.

मागील किमान ५ वर्षांमध्ये धानाचे ‘रत्नागिरी ८’ हे वाण महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य सहा राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या पसंतीस पडले आहे. सदर वाणाला प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधून मोठी मागणी आहे. तर राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये हे वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

बातमी शेअर करा
#PaddySeeds#PaddySeedsRatnagiri8RiceVariety
Comments (0)
Add Comment