टोमॅटो उत्पादक आनंदी : दरात झाली मोठी वाढ !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २३ नोव्हेबर २०२३

गेल्या काही महिन्यापूर्वी टोमॅटोला चांगले दर आले होते त्यानंतर अनेक शेतकरी लाखो रुपये कमाविले पण त्यानंतर काही दिवसात टोमॅटोचे दर पुन्हा घसरल्याने शेतकरी टेन्शनमध्ये आले होते पण सध्या टोमॅटो उत्पादकांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. टोमॅटोच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे. वाढलेल्या दरामुळे टोमॅटो उत्पादकांची चांदी झाली होती. ग्राहकांना जास्त किमतीने टोमॅटो खरेदी करावा लागत होता.

मागील काही महिन्यापासून पुन्हा टोमॅटोचे दर पडले होते. अशातच आता पुन्हा एकदा टोमॅटोचे दर वाढले आहेत. टोमॅटोचे दर ६० रुपयांवर गेला आहे. जून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत टोमॅटोचे दर चांगलेच तेजीत राहिले होते. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात २० नोव्हेंबपर्यंत १६९० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे.

मागील दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घातली आहे. घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रतिकिलो २ ते १२ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात कारले, शिमला मिरची, भेंडी, फरसबी, गवार, पडवळ, सुरण भाज्यांचा समावेश असून किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांनी वधारले आहेत. सर्व भाज्या ६० ते ८० रुपयांवर गेल्या आहेत.

बातमी शेअर करा
#tomato
Comments (0)
Add Comment