जगभरात तांदूळ २४ टक्क्यांनी महागला !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० नोव्हेबर २०२३

केंद्र सरकारने मागील काही दिवसांपासून अनेक पावले उचलली असून आता देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी देखील केंद्र सरकार निर्णय घेत आहे. यामध्ये तांदूळ निर्यातीवरील शुल्कात वाढ करत गैर-बासमती तांदळावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरात जवळपास 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तांदळाचे दर मागील 15 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत.

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीपैकी 40 टक्क्यांहून अधिक निर्यात भारतातून केली जाते. त्यातच आता देशांतर्गत बाजारातील वाढती महागाई लक्षात घेता भारत सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील बंदी पुढील वर्षीपर्यंत कायम ठेवली जाऊ शकते. या बंदीमुळे देशांतर्गत बाजारात तांदळाची उपलब्धता राहून दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा
#Rice
Comments (0)
Add Comment