‘या’ जातीची शेळीपालन केल्यास मिळणार भरपूर पैसे !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी शेती सोबत शेळीपालन हा व्यवसाय करून उत्त्पन्न मिळवत असतात. शेळीपालन हा व्यवसाय कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून या व्यवसायातून मिळणार नफा देखील चांगला असतो. त्यामुळे आता अनेक शेतकरीच नाही तर सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागले आहेत. या व्यवसायातील यशामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाला जितके महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे शेळ्यांच्या जातींची निवड याला देखील आहे.

तसे पाहायला गेले तर भारतामध्ये शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. परंतु यामध्ये काही शेळ्यांच्या जातीला बाजारामध्ये विशेष मागणी असते. अशाच पद्धतीने राजस्थानमध्ये आढळणारी शेळीची जात जी भारतातच नव्हे तर विदेशात देखील खूप लोकप्रिय असून आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारामध्ये देखील या शेळीच्या बोकडाला चांगली मागणी असते. या शेळ्यांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या दूध खूप कमी देतात परंतु या शेळ्यांपासून मांसाची उपलब्धता जास्त प्रमाणात असते. त्याकरिता या शेळ्यांचे संगोपन खूप फायद्याचे ठरते. शेळीच्या या महत्वपूर्ण आणि फायदेशीर असलेल्या जातीचे नाव आहे सोजत होय.

राजस्थान राज्याच्या पाली जिल्ह्यातील सोजत शहरांमध्ये ही जात आढळून येते. या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या शेळीची वाढ एका वर्षात खूप चांगल्या पद्धतीने होते व त्यामुळे मांस उत्पादन देखील जास्त मिळते. बहुतांशी सोजत जातीच्या शेळ्या दोन पिल्लांना जन्म देतात.

कधी कधी तीन पिल्लांना देखील जन्म देतात. त्यामुळे शेळी पालकांचा नफा या माध्यमातून वाढण्यास मदत होते. साधारणपणे सोजत जातीच्या चार शेळ्या घेऊन जर शेळीपालन सुरू केले तर नक्कीच दुप्पट नफा मिळू शकतो. पांढऱ्या रंगाच्या असणाऱ्या या शेळ्या दिसायला देखील आकर्षक असतात.

राजस्थान राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी बकरी मार्केट मोठ्या प्रमाणावर असून याला बकरी मार्केटचे हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणहून पाकिस्तान तसेच दुबई, अफगाणिस्तान आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील या ठिकाणहून सोजत जातींच्या शेळ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून याठिकाणी पुरवठा केला जातो. सोजत जातीच्या शेळ्यांचे मांस हे खाण्यास देखील चविष्ट असल्यामुळे याला विदेशात देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोजत जातीची शेळ्यांचे पालन करून शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

बातमी शेअर करा
#goats
Comments (0)
Add Comment