कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २६ डिसेंबर २०२२ I देशातील कापूस बाजार स्थिरावला होता. काही बाजारांमध्ये दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र मोठी घट कुठे दिसून आली नाही. काल कापसाचे दर क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत नरमले होते. मात्र आज कापूस दर आहे त्या पातळीवर होते.

 

कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. तर राज्यातील भावपातळी ७ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. ही दर पातळी पुढील काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम