महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 29 जुलै, 2022 रोजीच्या आदेशान्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना लागू करण्यांत आली असून, शेतकन्यांना सदर योजने अंतर्गत लाभ मिळणेकरीता विशिष्ट क्रमांकांची यादी दिनांक 23 डिसेंबर, 2022 रोजी पोर्टलवर प्राप्त झाली आहे. सदर योजने अंतर्गत विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहे. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले सरकार सेवा केंद्र तसेच सी. एस. सी. केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणिकरण यशस्वीरीत्या करून प्रस्तुत योजनेचा लाभ घ्यावा. विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये दि. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगांव या बँकेचे आजपर्यंत एकूण 45,088 व राष्ट्रीयकृत बँकांचे एकुण 12,143 असे एकुण 57,231 कर्जखाती आली असून, दि. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या बँकेचे तालुकानिहाय कर्जखाती खालील प्रमाणे :-

अंमळनेर – 5448, भडगांव -3067, भुसावळ -2421, बोदवड – 919, चाळीसगाव – 3968, चोपडा – 3998, धरणगाव – 3630, एरंडोल -2832, जळगाव -3904, जामनेर – 2446, मु. नगर – 581, पाचोरा – 4091, पारोळा – 4091, रावेर -959, यावल – 2783 एकुण 45088

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांचे कार्यालयामार्फत करण्यांत येत आहे. पात्र शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीस बोर्डवर विशिष्ट क्रमांकाच्या यादीत आपले नाव असलेबाबत खात्री करून घ्यावी व आपले सेवा सरकार केंद्र अथवा सी.एस.सी. केंद्रावर जाऊन यशस्वरीत्या आपले आधार प्रमाणिकरण करून घेऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम