एकरात मिळवले दोन लाखांचे उत्पन्न!; वाचा विठोबा रामदास करंजे यांची संपूर्ण कहाणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ एप्रिल २०२४ | सध्या पाऊस कमी असल्याने अनेक भागात शेती पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. सदर स्थितीत दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जयनगर परिसरातील शेतकऱ्याने उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवडीतून एकरी सुमारे सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

विठोबा रामदास करंजे असे सदर शेतकऱ्याचे नाव आहे., विठोबा रामदास करंजे हे शहादा तालुक्यातील जयनगर येथील रहिवासी असून शहादा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे योग्य नियोजन करून, विठोबा रामदास करंजे यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीन टप्प्यामध्ये केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली. तीन टप्प्याच्या लागवडीतून अडीच-अडीच महिन्यात एकूण लागवडीपैकी दोन टप्प्यांमध्ये चांगले उत्पन्न मिळाले. एकरी पवणे दोन ते लाखांचे उत्पन्न विठोबा रामदास करंजे यांना टरबूज पिकातून मिळाले आहे.

जयनगर सोबतच परिसरात अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती असल्याने, पिकांना पाणी पुरविणे जिकिरीचे जात आहे. परंतु, विठोबा रामदास करंजे यांच्या विहिरीला चांगले पाणी आहे. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन करून केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले. संकरित बियाण्याचा वापर करून केळी पिकात ठिबक सिंचनाच्या मदतीने आंतरपीक म्हणून लावलेल्या टरबुजासाठी रासायनिक खत व औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्याने चांगले उत्पादन विठोबा रामदास करंजे यांना मिळाले आहे.

केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाचे उत्पन्न घेण्याचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने केळीवर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही. वातावरणाप्रमाणे रासायनिक विद्राव्य खताचे तसेच औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पन्न घेता येते. एकरी सरासरी टरबूज पिकाला ६० हजार रुपये भांडवल लागले. अंदाजे १० ते १२ रुपये प्रती किलो दर मिळाला आहे. ज्यामाध्यमातून त्यांना एकरी पवणे दोन ते लाखांचे उत्पन्न त्यांना टरबूज पिकातून मिळाले आहे. असे शेतकरी करंजे यांनी म्हटले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम