शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी !

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ एप्रिल २०२४ | शेळीपालन : वाढत्या तापमान आणि पाण्याचे दुर्भिक्ष अशा दुहेरी संकटात बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे. सर्वसाधारणपणे शेळ्या-मेंढ्यांचा जन्मकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो. परंतु, नवीन जीव जन्मसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी घेणे अगदी गरजेचे आहे.

या वर्षी निसर्गाचा, वातावरणाचा लहरीपणा आणि हवामान स्थिती फारच गंभीर आहे. लगद दोन वर्षे कमी-अधिक पाऊस झाल्याने त्याची झळ शेळ्या- मेंढ्यांना देखील बसत आहे. कधी नव्हे ते शेळ्या-मेंढ्यांसाठीही छावण्यांची मागणी अलीकडे सातत्याने होत आहे.

शेळ्या जर जास्त काळापर्यंत उन्हात राहिल्या किंवा बाहेर मोकळे सोडल्या, तर ही समस्या जाणवण्याची दाटून शक्यता असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा-पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः १०५-१०६ फॅ. पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.

एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाचा विशिष्ट वास येतो.

paid add

अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते. मात्र शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्लेष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसते. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.

उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (६ ते १० वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (३ ते ७ वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रोलाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा शेळ्यांना पाजावे. तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे. जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे. सोबतच जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असेल, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा असे अपचन होत असते.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम