कृषी सेवक I ७ डिसेंबर २०२२ I बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळं आज (7 डिसेंबरला) चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळं गुरुवारी (8 डिसेंबर) आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात सात ते 10 डिसेंबर दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ मुंबईसह कोकणमधून जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, याचा विदर्भात कोणताही प्रभाव नसला तरी थंडीचा जोर कमी झाला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम