राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक

बातमी शेअर करा

 

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | रविवारी भाजीपाल्यांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. परराज्यांतील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ६ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट्‌स, फ्लॉवरसह तांबडा भोपळा, हिरवी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार १०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, कांदा सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती.

कांदा : २५०-३३०, बटाटा : २२०-३००. लसूण : १५०-५००, आले : २००-४५०, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-३००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : २५०-३००, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : २००-२५०, वांगी : २५०-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ४००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ४००-५००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक: १२००-१६००, पावटा : ४५०- ५००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दोन लाख, तर मेथीची ६० हजार जुड्यांची आवक झाली होती.

कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : १२००-१८००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१६००, चाकवत : ४००-७००, करडई : ५००- ७००, पुदिना : ३००-६००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : १०००-१५००.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम