पंचनाम्यासाठी पैसे मागणाऱ्या कृषी सहाय्य्क निलंबित

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महिला कृषी सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

paid add

पंचनामे करण्याकरिता अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी एजंट शेतकर्‍यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे लोक पैशांची मागणी करतात. त्याशिवाय पंचनामे करत नाहीत. अशी लेखी तक्रार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती. तिची दखल घेत कृषीमंत्र्यांनी कृषी सहाय्यक रोहिणी मोरे यांना निलंबित केले आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम