नेप्ती उपबाजार समितीत तब्बल २६ हजार २४१ क्विंटल कांद्याची आवक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 26 हजार 242 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला सरासरी 2300 ते 2900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. दिवाळी सणामुळे बाजार समितीतील लिलाव बंद होते. त्यामुळे कांदा आवक वाढेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र गुरुवारी आवक जेमतेम होती. यावेळी भाव मात्र वाढल्याचे दिसून आले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लिलावासाठी 26 हजार 242 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 2500 ते 2900 रुपये, दोन नंबर कांद्याला 1600 ते 2300 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1600 रुपये आणि चार नंबर कांद्याला 200 ते 800 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत.

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम