थंडीचा जोर वाढल्याने २४ तासात होणार पाऊस !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ८ फेब्रुवारी २०२३।  गेल्या काही दिवसापासून देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारीमध्ये देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, आसाम आणि मेघालयमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात दक्षिण तमिळनाडू, दक्षिण केरळ, अंदमान आणि निकोबारच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांमध्ये पावसासह बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये दोन दिवस दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यामध्ये किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हुडहुडी कायम आहे. राज्यामध्ये पुढचे दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम