जनतेला मिळणार दिलासा : या डाळीचे होणार भाव कमी !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ८ फेब्रुवारी २०२३। देशात असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य लोकांचे जीवनावाश्यक वस्तूचे हि दर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले आहे. तर दिवाळी सणाच्या आगोदर डाळी आणि कडधान्याचे वाढलेले भाव अजून जशाचं तसे आहेत. होळीच्या सणानंतर दर कमी होतील असा अंदाज एपीएमसी मार्केट मधील घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या सर्व डाळी व कडधान्यांचे भाव शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन यायला सुरुवात झाल्यानंतर डाळीचे आणि कडधान्याचे दर कमी होतील. दिवाळीच्या दरम्यान नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये डाळी कडधान्य कमी प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे डाळींचा दर अद्याप उतरलेला नाही.

मूगडाळ ९० ते ९८
तूरडाळ 100 ते 125
उडीद डाळ 104 ते 120

सर्वसाधरणपणे दिवाळीनंतर बाजारात नवीन पिकांचे उत्पादन येण्यास सुरुवात होते. परंतु यावर्षी एपीएमसी मधील घाऊक बाजारात दिवाळींनतर येणाऱ्या डाळी, कडधान्यांचे प्रमाण कमी होते. त्यातच आयात होणाऱ्या डाळींचे प्रमाणही कमी आहे. सध्या बाजारात जुनाच माल उपलब्ध आहे. नवीन वर्षात नवीन उत्पादन यायाला सुरुवात झाली की, डाळी कडधान्यांचे भाव कमी होतील. होळीनंतर ही आवक वाढण्याची शक्यता आहे. तो पर्यत हे भाव चढेच राहणार आहे.

मूग 104 ते 120
मटकी 90 ते 110
चवळी लहान 156 ते 160
चवळी मोठी 105 ते 130
गाबोली चणे 120 ते 156
वाल 180 ते 200

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम