तुरीला सरासरी ७५०० रुपयांपर्यंत दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र सध्यातरी तुरीचे दर तेजीत आहे. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

 

तर जाणकारांच्या मते आयात वाढली तरी, तुरीचे दर तेजीत राहतील. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात घट होणार आहे. देशात तुरीची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी कमी राहिली.

 

मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तर फूलगळही वाढली. या सर्व घटनाक्रमामुळे यंदा तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास २५ ते ३० टक्के कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

 

सध्या तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील. मात्र यंदा तुरीची दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असा अदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम