जळगावातील केळी उत्पादक “अच्छे दिन” च्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील केळी ही विशिष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध असून, या चवीमुळेच येथील केळींना जगभरातून खास मागणी असते. मात्र पावसासह अनेक समस्यांमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण, बाजारभावातील चढ-उतार, रासायनिक खतांच्या वाढत्या किंमतींमुळे तसेच केळी पिकांवरील कुकुम्बर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) व करपा रोगांमुळे केळी उत्पादकांसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकला आहे.

याचबरोबर, करपा रोगावरील औषध प्रति हेक्टरी फक्त २०० रुपयांना उपलब्ध होत होते. मात्र २०१६ नंतर हे औषध उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना चढ्या दराने विकत घ्यावे लागत असून, या औषधासाठी अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशातच ज्या शेतकऱ्यांच्या थेट शेतात गाडी पोहोचते, त्यांनाच उत्तम बाजारभाव तर इतर शेतकऱ्यांना २०० ते ५०० रुपये कमी दराने बाजारभाव मिळत असल्याने रस्ते बनणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, बांधावरील केळींना चांगला बाजारभाव असतो.

आता जळगावच्या केळीला व केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी “अच्छे दिन” येतील काय माहित.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम