आता कांदाही रडवणार; भाव वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २० सप्टेंबर २०२२ । एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे, तर दुसरीकडे यात भर म्हणून आता कांद्याचे भावही कडाडतील. परिणामी, गृहिणींचे बजेट कोलमडणार आणि कांदा जाम रडवणार, असे चित्र आहे.

सध्या बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर मोठा, चांगला ए-वन कांदा ३५ रुपयांपर्यंत मिळतो. मात्र सततच्या जोरदार पावसामुळे जुना कांदा भिजल्याकारणाने साठवलेला कांदा खराब होत चालला आहे. म्हणून, स्थिर असलेले कांद्याचे दर हे वाढणार असल्याची शक्यता आहे.

श्रावणानंतर कांद्याच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. यंदा दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास १० ते १५ रुपयांनी कांद्याचे दर वाढू शकतात. घाऊक बाजारात सध्या कांद्याचे दर १० ते १४ रुपये, तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर २० ते ३० रुपये आहेत.

सध्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांत कांद्याचे नुकसान झाल्यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो. महाराष्ट्रात नवीन कांद्याची काढणी नोव्हेंबरला होईल. त्यामुळे एक ते दीड महिना नागरिकांच्या खिशाला चाट बसू शकते.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम