शेतकऱ्यांना मोठा दिलासा : राज्यातील ‘हा’ जिल्हा दुष्काळाच्या यादीत !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १२ नोव्हेबर २०२३

राज्य सरकारने गेल्या काही दिवसाआधी दुष्काळ जाहीर केला होता पण अनेक ठिकाणी शेतकर्यांनी आंदोलने केली आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पीक सर्व्हेनंतर राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने उर्वरित सहा तालुक्यातही दुष्काळ जाहीर केला आहे.

यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने अनेक भागात दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश होता. मात्र लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नियमानुसार शासनाकडून आठ सवलती मिळणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे राज्य शासनाने उर्वरित सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापुर,पंढरपूर, मंगळवेढा, आणि मोहोळ यात तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम