देशाची केळी पहिल्यांदा सागरी मार्गाने निर्यात !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १२ नोव्हेबर २०२३

जगभरात भारत येथे उत्पादन झालेली केळी प्रसिद्ध आहे, त्यामुळे अनेक देशातून या केळीला मोठी मागणी असून भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात हा एक मैलाचा दगड ठरला आहे. यामध्ये मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या माध्यमातून सागरी मार्गाने तब्बल १९.५ मेट्रिक टन केळी युरोपच्या दिशेने रवाना करण्यात आली.

paid add

कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी या निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्यातील अपेडा नोंदणीकृत निर्यातदार आयएनआय फार्म्स यांच्याकडून ही निर्यात करण्यात आली. ही निर्यात प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी अपेडाकडून कंपनीला संपूर्ण पाठबळ देण्यात आले. यामुळे भारताच्या केळी निर्यात क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने अपेडाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल विभागाच्या महाव्यवस्थापिक विनिता सुधांशू, मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी निर्यातदार व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाव देण्यासाठी अपेडाचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत. युरोपात भारतीय केळ्यांना खूप मागणी असून या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याच्या दृष्टीने जलमार्गाने होणारी ही केळी निर्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम