मिरची, पपई व केळी पिकांसाठी ठिबक सिंचन योजनेत ९० टक्के अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | नंदुरबार जिल्ह्यात मिरची, पपई व केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यांची निर्यात करण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी तसेच गुजरात राज्याप्रमाणे ठिबक सिंचन योजनेत ९० टक्के अनुदान राबविण्यात यावे अशी मागणी बोरद ता. तळोदा येथील शेतकरी मिलिंद पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे आयोजित भेटीदरम्यान केली.
आदिवासी बांधव हे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भगर, मोह आदी उत्पादन घेत आहेत.ते पौष्टिक असून त्याचे नवीन वाण प्रसारित करून एखादा मध्यम प्रकल्प राबवण्यात यावा आदी मागण्या मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी हितगुज करताना केल्या. यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातील काही शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त स्नेहभोजन व हितगुज करण्यासाठी आमंत्रित होते. नंदुरबार जिल्ह्यातून बोरद ता.तळोदा येथील शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पत्नी सौ. राजश्री मिलिंद पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाटील दांपत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे कुलदैवत आई देवमोगरा मातेची प्रतिमा भेट दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम