औरंगाबाद विभागातील २७ साखर कारखाने गाळप करणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | औरंगाबाद विभागात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून गेल्या वर्षी विभागात २५ साखर कारखाने सुरू मात्र यंदा २७ साखर कारखाने गाळप करणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या कार्यालयाने दिली आहे.औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र कमी असल्याने वेळेत गाळप होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिल्यानंतर पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम