यंदाच्या खरिपात ‘या’ कापूस वाणांची लागवड करा; मिळेल भरघोस उत्पादन!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ एप्रिल २०२४ | राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याची गेल्या काही वर्षांपासून मक्तेदारी पाहायला मिळत आहे. देशात कापूस लागवड आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा शीर्ष स्थानावर विराजमान आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकांची लागवड केली जात आहे.

यंदा मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा दावा होऊ लागला आहे. तसेच जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कपाशी लागवड करण्याच्या विचारात असाल. तर आज आपण कापसाची दाट लागवड करायची असेल तर कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. तसेच पाण्याची कमतरता असल्यास कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. या संदर्भात देखील थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

1. कावेरी सीड्स कंपनीचे जादू : जर तुमच्याकडे हलकी ते मध्यम जमीन असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. तुम्हाला कापसाची दाट लागवड करायची असेल तर तुम्ही याची निवड करायला काही हरकत नाही. हा वाण कोरडवाहू तथा बागायती भागात पेरणीसाठी उपयुक्त आहे. सरासरी १५५ ते १७० दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. चार बाय दीड फूट अंतरावर याची लागवड केली जाऊ शकते. ही जात वेचणीला खूपच सोपी आहे. रसशोषक किडींना ही जात प्रतिकारक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे या जातीपासून चांगले उत्पादन मिळू शकते.

paid add

2. ॲग्री सीड्स कंपनीचे युएस ७०६७ : तुम्हाला कापसाची दाट लागवड करायची असेल तर तुम्ही या जातीची निवड करू शकता. परंतु या जातीच्या कापसाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत केली पाहिजे. कोरडवाहू तथा बागायती भागात याची लागवड केली जाऊ शकते. अवरेज १५५ ते १६० दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. म्हणजेच कापसाचे हे एक लवकर परिपक्व होणारे वाण आहे.

3. अजित सीड्स कंपनीचे अजित १५५ कापूस वाण : तुमच्याकडे जर पाण्याची कमतरता असेल व लागवड करायची असेल तर अजित सीड्स कंपनीचे अजित १५५ हे वाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी पाण्यातूनही अजित सीड्स कंपनीच्या या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जाऊ शकते. कोरडवाहू तथा बागायती भागात ही जात पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. १४५ ते १६० दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम