गाजराचे दर वधारले ; ५ हजार रुपयांपर्यंत मिळतोय भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | गाजराला सध्या चांगली मागणी असल्याने बाजारात चांगला दर मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे गाजराच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सध्या बाजारातील गाजराची आवक कमी झालेली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजार समित्या वगळता गाजराची आवक सरासरी २० क्विंटलपेक्षा कमीच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाजराच्या दराने सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांचा टप्पा गाठला असून गाजराचे दर पुढली काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम