डाळींबाच्या दरात घसरण ;५ हजार ते ८ हजार दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | सध्या बाजारात डाळिंबाची आवक थोडी कमी झालेली असल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये डाळिंबा दरामध्ये घसरण जाणवत आहे. डाळिंबाच्या गुणवत्तेवर पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे परिणाम झाला. त्यामुळे अशा डाळिंबाला मिळणारा दरही घसरला आहे. . राज्यात बाजार समित्यांमध्ये आवक होणाऱ्या डाळिंबाची सरासरी ५ हजार ते ८ हजार रुपयाने विक्री होत आहे. दर्जेदार डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. मात्र अशा डाळिंबाचं प्रमाण कमी आहे. डाळिंबाचे दर पुढील काही दिवस असेच राहू शकतात, असे जाणकार व्यक्तींनी म्हटले आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम