सावधान : या वेळेत पडू नका घराबाहेर..हवामान खात्याचे आवाहन !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २१ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील तापमान आता दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढले असून हवामान खात्याने जनतेला आवाहन देखील केले आहे. पुढील 24 तासात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे. दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या 24 तासांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. तर कोकणामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्यासह गोव्यामध्ये देखील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर गुजरातच्या कच्छमध्ये देखील तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान आणि कमान तापमानात मोठी तफावत दिसून आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाची चटके जाणवत आहे. म्हणूनच नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

थंडी संपतात लगेच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम