कृषी सेवक । २१ फेब्रुवारी २०२३। कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीने मोबाईलद्वारे देशातील कानाकोपऱ्यात घडलेल्या घटना पाहिल्या त्यानंतर सर्वच सोशल मिडीयावर थेट शेतकरीने देखील आपल्या शेतातील भाजीपाला विकू लागले होते याचाच आदर्श घेत एका तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून केळी लागवडीचं तंत्र अवगत करून आज लाखो रुपये तो कमवू लागला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणाऱ्या हिंगोणी येथील कुंदन पाटील या तरूण शेतकऱ्याने विलायची केळी लागवड केली. त्याने अडीच एकरामध्ये तब्बल 15 लाख रुपयांचा नफा मिळवल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आहे. विलायची केळीचं पीक हे प्रामुख्याने आंध्रप्रदेश भागामध्ये घेतलं जातं. मात्र त्या भागामध्ये यार्षी लागवड कमी झालेली आहे. कुंदन पाटील या तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून केळी लागवडीचं तंत्र अवगत केलं. त्यामुळे गेल्यावर्षी या केळीची लागवड केली.
विलायची केळी आकाराने लहान मात्र खायला गोड आणि चवदार असते. त्यामुळे या केळीला मोठ्या शहरांमध्ये प्रचंड मागणी असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या केळीला दरही चांगला मिळत आहे. यावर्षी कुंदन पाटील या तरुणाला अडीच एकर क्षेत्रामध्ये लावलेल्या 3000 झाडांचे तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. केळीची पहिली तोडणी झाली असून, या पहिल्या तोडणीला 4800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे. त्यामुळे एक वेगळा प्रयोग करून कुंदन पाटील यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न काढलं आहे. अन्य तरुण शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने शेतात प्रयोग करून उत्पन्न वाढवावे असं आवाहन शेतकऱ्यांना कुंदन पाटील या तरुणाने केले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम