ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २५ रोजी चक्काजामचा इशारा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ |ऊसदरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आंदोलन करत आहेत.

 

त्यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा देखील काढला होता. 25 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी ‘चक्का जाम आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता तरी त्यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करत आहेत.

 

राजू शेट्टी म्हणाले, सत्ताधारी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे. शेतकऱ्यांना रास्त भाव मोबदला (FRP) एकरकमी देणे अनिवार्य करण्याच्या मागणीपासून मागे हटणार नाही.एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला, त्याची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे. यामुळे लढा देण्याची गरज आहे. ते म्हणाले, आता मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम