कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला आहे.रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्यास पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.
आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, 13 डिसेंबरपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तुरळक हलक्या पावसासह मुंबईत ढगाळ वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम