सोयाबीनला सरासरी ५ हजार ६०० रुपयांचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत.

 

सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे. मात्र जानेवारी महिन्यात खाद्यतेलाचे दर वाढण्याचा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचेही दर वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम