कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ |ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होऊन दरात वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची आवकही बाजारात सध्या घटली. पुणे आणि मुंबई बाजार समित्या वगळता इतर बाजारातील आवक सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं ढोबळ्या मिरचीचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम