मका स्थिर; हरभऱ्याच्या किमतींत वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I कापूस, मका, हळद, हरभरा व सोयाबीन यांच्या किमती नोव्हेंबरमध्ये वाढत होत्या; मात्र सोयाबीनच्या किमती नंतर उतरू लागल्या आहेत. मक्याची मागणी वाढती आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात आवक वाढली तरी किमतीसुद्धा वाढत होत्या. कांद्याचे दर मात्र घसरले. पिंपळगावमध्ये या महिन्यात कांद्याच्या किमती रु. २६५० वरून रु. १४५० वर आल्या.
या पूर्वी २०११, २०१६ व २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती रु. १००० पेक्षा कमी झाल्या होत्या. टोमॅटोचीही आवक वाढून किमती घसरल्या. या सप्ताहात कांद्याने रु. १,३३० ची पातळी गाठली आहे तर टोमॅटो रु. ४९२ वर आले आहेत.

१ डिसेंबर पासून NCDEX मध्ये मक्यासाठी एप्रिल डिलिव्हरी व हळदीसाठी जून डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले आहेत.मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती प्रति क्विंटल रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या रु. २,२०० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२०० वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२४३ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी राहील, असा शासनाचा अंदाज आहे. परंतु मक्याची मागणीसुद्धा वाढती राहण्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम