तुरीला ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I यंदा देशातील तूर उत्पादनघटण्याची शक्यता असल्याने तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज होता. मात्र देशातील बाजारात सध्या तुरीचे दर नरमलेले दिसत आहेत.

 

तरीही दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. केंद्राने यंदा तुरीसाठी प्रति क्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात तुरीला ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर आहेत. नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात वाढली.

 

त्यामुळे या तुरीला ६ हजार ४०० रुपये ते ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे. यंदा देशातील तूर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आयात झाली तरी त्याचा दरावर फारसा परिणाम होणार नाही, असं काही अभ्यासक सांगत आहेत. त्यातच सरकारही यंदा तुरीची खरेदी वाढवण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे यंदा तुरीला सरासरी ७ ते ८ हजारांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम