कापसाच्या दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होताना दिसतेय. आज कापूस ८२ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. तर देशात मात्र आज कापसाच्या दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमाई दिसली.

 

कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार २०० रुपये दर मिळाला. तर आज सीसीआयने ८ हजार १०० रुपयांचा दर काढला होता. मात्र दर कमी झाल्यानं शेतकरी कापूस विक्री पुन्हा कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

 

तर जाणकारांच्या मते चालू महिन्यात कापूस दर कमी जास्त होऊ शकतात. मात्र जानेवारीत दर सुधारु शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम