केळीची बाजारातील आवक कमी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I केळीच्या लागवडी अनेक भागांमध्ये आटोपल्या आहेत. सध्या केळीची बाजारातील आवक कमी आहे. चालू हंगामात सुरुवातीला केळीला चांगला दर मिळाला.

मात्र नंतर दरात मोठी घसरण झाली होती. आता केळीची आवक कमी असूनही दर दबावात आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये दर मिळतोय. त्यातच थंडी कमी असल्याचाही परिणाम केळीच्या दरावर होतोय. पुढील काळात केळीचे दर सुधारु शकतात, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम