कापूस दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I 30 डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या वायद्यांमध्ये कापसाचे दर कमी झाले होते. तर प्रत्यक्ष खरेदीतील दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स सुद्धा कमी झाला होता. मात्र देशातील बाजारात कापूस दर आज स्थिर होते.

आज देशात कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील सरासरी दर ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर होते. सध्या बाजारातील कापूस आवक जास्त असली तरी सरासरीच्या तुलनेत कमीच आहे. जानेवारीत बाजारातील कापूस आवक मर्यादीत होऊन दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम